मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विषयावर टिप लिहा: अंकीकृतकरणाची वैशिष्ट्ये - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर टिप लिहा:

अंकीकृतकरणाची वैशिष्ट्ये

टीपा लिहा

उत्तर

  1. संगणकीकरण: दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संगणकाच्या उपयोगाचा प्रसार झाला आहे. पूर्वी प्रत्यक्ष श्रमांच्या आधारे ज्या प्रक्रिया पूर्ण केल्या जायच्या किंवा ज्या प्रक्रिया क्लिष्ट होत्या, त्या आता केवळ संगणक प्रणाली, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र यांच्या मदतीने सहजसुलभ झाल्या आहेत. त्यामुळे संगणकीकरणाच्या प्रक्रियेला मदत होते. पर्यायाने अनेक क्षेत्रांतर्गत प्रक्रियांचे अंकीकरण झाले आहे. उदाहरणार्थ, शिक्षण, बॅंकिंग, महसूल, करसंकलन, विपणन यांसारखी क्षेत्रे.
  2. सातत्याने बदल होणे: अंकीकृतकरणामुळे उद्योगधंद्यांच्या आकृतिबंधांमध्ये सातत्याने बदल होतात कारण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत बदल घडून त्याचा विकास होत असतो. तुम्ही उत्पादन, वस्तुनिर्माण, शल्यचिकित्सा, यंत्रमानव, डिझाइनिंग अशा विविध क्षेत्क्षेरात केल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल काही ऐकले आहे का?
  3. वेग आणि अचूकता: अंकीकृतकरणामुळे प्रक्रियांची गती आणि अचूकतेचे प्रमाण यांचा वेग लक्षणीयरीत्या वाढतो. उदाहरणार्थ, नवीन माहिती शोधणे (data mining), माहितीच्या उपयोजनांच्या प्रक्रिया, माहितीचे विश्लेषण, माहितीचे व्यवस्थापन या सर्व प्रक्रियांमागे असलेल्या तंत्रज्ञानामुळे वेग, अचूकतेचे प्रमाण वाढते, त्यामुळे शासकीय व्यवस्था, औषधोपचार, व्यापार, बॅंकिंग, विमा, गृहनिर्माण, शेअरबाजार, संपर्क आणि दळणवळण यांसारख्या अनेक क्षेत्रांतील कार्यक्षमता वाढते.
  4. तंत्रज्ञानकेंद्रित प्रक्रिया: अंकीकरण आणि संगणक प्रणालींचे दैनंदिन जीवनातील उपयोजन हे तंत्रज्ञान, नावीन्य, संशोधन आणि प्रगती यांवर आधारलेले असते, हे आता वेगळेपणाने सांगायला नको. १९८० च्या दशकात ३८६ मायक्रोप्रोसेसर किंवा ४८६ मायक्रोप्रोसेसर वापरणारे तंत्रज्ञान विकसित होत होत आपण आता मायक्रोप्रोसेसच्या पाचव्या पिढीपर्यंत पोचलेलो आहोत. भ्रमणध्वनी क्षेत्रातही आपण आता 5G कडे जात आहोत.
  5. निर्मितीशीलतेला चालना: त्वरित माहिती मिळवण्याची गरज, समस्यांवरील त्वरित उपाय शोधणे या गोष्टींमुळे मानवी बुद्धिला नवीन शोध लावणे, नावीन्याची निर्मिती करणे, स्वामित्व हक्क मिळवणे यांसाठी प्रोत्साहन मिळते. वैमानिकाने खरोखरीचे विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांना कॉकपिटचा अनुभव मिळावा म्हणून कॉकपिटच्या जमिनीवरील प्रतिकृती/अनुकृती च्या आधोरे प्रशिक्षण दिले जाते.
  6. ग्राहकांना महत्त्व: अंकीकृत रूपांतराचा अंतिम लाभार्थी ग्राहक असतो. त्याच्यासाठी अंकीकृत रूपांतरातील विविध प्रक्रियांना उपयुक्तता मूल्य आहे. उदाहरणार्थ, उत्पन्नावरील कर भरणे किंवा भरलेल्या करावरील परतीसाठी अर्ज भरणे, महानगरपालिकेतून जन्ममृत्यू इत्यादींचे दाखले मिळवणे, ऑनलाईन प्रवेश मिळणे, निवडणुकांचे निकाल जाहीर होणे यांसारखी अनेक कामे अंकीकृत रूपांतरामुळे सहजतेने करून घेणे शक्‍य झाले. काही दशकांपूर्वीपर्यंत या सर्वांसाठी उपयोगात असणाऱ्या प्रक्रिया आता पूर्णपणे बदलल्या.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×