Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर टिपा लिहा.
भारतातील विविधता
टीपा लिहा
उत्तर
- 'विविधतेत एकता' असलेला देश अशी भारताची ओळख आहे. भारतातील वैविध्याचे स्रोत अनेक आहेत. त्यांपैकी वांशिक मूळ, धर्म, जाती, आदिम संस्कृती, भाषा, सामाजिक रूढी, सांस्कृतिक आणि उप-सांस्कृतिक श्रद्धा, राजकीय तत्त्वज्ञान आणि विचारधारा, भौगोलिक भेद हे काही ठळक स्रोत आहेत.
- ऐक्यभाव म्हणजे एकजूट किंवा 'एकात्मभाव' होय; यामुळे वैविध्यपूर्ण वांशिक समुदाय किंवा संस्था आणि त्यांच्या श्रद्धा परस्परांशी जोडलेल्या राहतात. प्रस्थापित संरचना, नियम आणि मूल्यांच्या माध्यमातून अपेक्षित ऐक्यभाव समाजात रुजवला जातो.
- 'विविधतेत एकता' या संज्ञेतून वैविध्याखेरीज एकात्मभाव असा अर्थ प्रतीत होतो. 'विविधतेत एकता' हे सूत्र सामाजिक बांधणी, जात, लिंगभाव, पंथ, संस्कृती आणि धार्मिक पद्धतींतील व्यक्तिगत आणि सामाजिक फरकांतून अधोरेखित होते. विविधतेत एकता या सूत्रानुसार फरक हे संघर्षाचे कारण मानले जात नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?