मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.

टीपा लिहा

उत्तर

'स्वप्न करू साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेत कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा या मूल्यांसोबतच एकात्मता या मूल्याचे महत्त्व कवी स्पष्ट करत आहे.

कवी म्हणतात, की आम्ही देशवासीय असंख्य असलो तरी आमच्यात एकीचे बळ आहे. आमच्या मनगटांत एकतेची शक्ती आहे. या एकीचे दर्शन घराघरांतून जन्म घेणाऱ्या तेजस्वी अशा नव्या पिढीतही दिसेल असा सकारात्मक दृष्टिकोन कवी येथे व्यक्त करतात.

या देशाच्या मातीवर 'आमचा' अधिकार आहे आणि नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न 'आम्ही' मिळून साकार करू असा निर्धार व्यक्त करतात. शेतीचा विकास करून देशात 'आम्ही' समृद्धी आणू, यंत्रशक्तीला सोबत घेऊन उद्योगधंद्यांची भरभराट होईल, इतके श्रम करू, असा आशावादी विचार व्यक्त करतात. शिवाय, या एकीच्या बळावर विश्वातील ऐश्वर्याचे संवर्धन करण्याचा व ती लाखपटीने वाढवण्याचा विश्वास ते व्यक्त करतात. देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने साकार होण्याकरता एकात्मतेचे सामर्थ्य अत्यंत महत्त्वाचे आहे, हेच कवी संपूर्ण कवितेत सांगू पाहतात.

shaalaa.com
स्वप्न करू साकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16.1: स्वप्न करू साकार - कृती [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 16.1 स्वप्न करू साकार
कृती | Q (३)(ई) | पृष्ठ ६०

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-


आकृतिबंध पूर्ण करा.


खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।


खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।


या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.


खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।


खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुददे 'अंकिला मी दास तुझा' किंवा 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री    
2. प्रस्तुत कवितेचा विषय    
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण    
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -
i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

किंवा

मुददे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट।
सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) शुभंकर -
(ii) उज्जवल -
(iii) विभव -
(iv) अमुचा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - 

‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’

(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) विभव -
(ii) शक्ती -
(iii) विश्‍व -
(iv) हस्त -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×