Advertisements
Advertisements
प्रश्न
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर
लहान मुलांचे हास्यचित्र काढण्यासाठी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. लहान मूल हे लहान दिसणे सर्वांत कठीण असते. लहान मुलाच्या आकाराच्या बाजूस मोठ्या माणसाचा आकार काढणे किंवा दाढीमिश्या न काढणे, शर्ट-चड्डी काढणे या गोष्टी त्यासाठी पुरेशा नसतात, तर लहान मुलांची शारीरिक ठेवण, त्यांचे वागणे-बोलणे, चेहऱ्यावरील कुतूहल, त्यांच्या विक्षिप्त प्रतिक्रिया त्यांची निरागसता, चलाखी, चतुराई हास्यचित्रातून प्रतिबिंबित व्हावी लागते.
लहान मुलाचे चित्र काढताना त्याचा एकूण आकार लहान असावा लागतो. त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे गरजेचे असते. हाता-पायांची बोटे लहान, त्यांची नखे लहान, नाक-ओठ लहान, भुवया सुद्धा लहान किंवा एका रेषेच्या काढाव्या लागतात. अशाप्रकारे, लहान मुलांचे हास्यचित्र काढताना वरील अनेक बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते त्यामुळे ते अवघड आहे.
संबंधित प्रश्न
खालील फरक लिहा.
व्यंगचित्र | हास्यचित्र |
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
वैशिष्ट्ये लिहा.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
खालील चित्राचे निरीक्षण करा.
- शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
- ही समस्या का निर्माण झाली असावी?
- पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर... कल्पना करा व लिहा.
- ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
- या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.