Advertisements
Advertisements
प्रश्न
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर
केवळ 'हसवणे' हाच व्यंगचित्राचा हेतू नाही. व्यंगचित्रात एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. या पाठात अनेक व्यंगचित्रे दिली असून, यांपैकी प्रत्येक चित्र पाहून 'व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे' हा विचार पटतो. येथे अमेरिकन व्यंगचित्रकार डेव्हीड लँग्डन यांची चित्रे दिली आहेत. त्यातील एका चित्रात एक लहान चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडताना दिसत आहे. त्याने पट्ट्यापट्ट्यांचे घातलेले शर्ट आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याच्या या पराक्रमाची आपल्याला जाणीव होते. मुलातील चतुरतेचा गुण येथे दिसतो.
तर, चिंटूच्या चित्रमालिकेतील व्यंगचित्रातून चिंटूचा धांदरटपणा आणि सोबतच बुद्धीचातुर्यही दिसते. पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे चित्र दिले आहे. त्यात, लहानपणी मोठे वाद्य व मोठेपणी लहान आकाराचे वाद्य वाजवणारा मुलगा दिसतो. यात लहान मुलांमधील मोठ्या वस्तूंचे आकर्षण व वाढत्या वयानुसार अधिक खोल-सूक्ष्म होत जाणारा छंद यांचे दर्शन घडते. अशाप्रकारे, ही सर्व व्यंगचित्रे माणसांतील गुण-दोषांकडे लक्ष वेधतात.
संबंधित प्रश्न
खालील फरक लिहा.
व्यंगचित्र | हास्यचित्र |
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
वैशिष्ट्ये लिहा.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
खालील चित्राचे निरीक्षण करा.
- शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
- ही समस्या का निर्माण झाली असावी?
- पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर... कल्पना करा व लिहा.
- ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
- या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.