Advertisements
Advertisements
प्रश्न
लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर.
उत्तर
मानवी लोकसंख्येत विविध वयोगटांच्या व्यक्ती असतात. ज्यामध्ये नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, युवक, प्रौढ़, वृद्ध आणि अतिवृद्ध लोकांचा समावेश होतो. अर्थात हे वयोगट अगदी ढोबळ आहेत. अभ्यासाच्या दृष्टीने असे वयोगट करताना वयोगटाची रचना ०-५, ५-१०, १०-१५, १५-२०, २०-२५ अशाप्रकारे १०० वर्षांपर्यंत विविध गटामध्ये केली जाते. प्रत्येक वयोगटातील लोकांची संख्या जर एका आलेखाद्वारे व्यक्त केली, तर जी रचना प्राप्त होते त्याला लोकसंख्या मनोरा म्हणतात.
अशाप्रकारे लोकसंख्या मनोरा तयार करताना, प्रत्येक वयोगटात पुरुष आणि स्त्रियांचे प्रमाण अशी वर्गवारी करून हा वय लिंग मनोरा तयार केला जातो. थोडक्यात वय लिंग मनोऱ्यात वय रचना आणि लिंग रचना किंवा लिंग गुणोत्तर या दोन्ही घटकांची माहिती मिळते. लोकसंख्या मनोऱ्याचे विस्तारणारा, संकोचणारा आणि स्थिरावलेला असे तीन प्रकार आढळतात. सर्वसाधारणपणे विस्तारणाऱ्या लिंग मनोऱ्यात ० ते १५ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असतेच, मात्र, त्यातही पुरुषांचे प्रमाण जास्त असते आणि स्त्रियांचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ स्त्री जन्मदराचे प्रमाण कमी असते किंवा या वयोगटातील स्त्रियांच्या जीविताचे प्रमाण कमी असते. याचाच परिणाम पुढे कार्यशील गटातही दिसून येतो आणि १५, ३०, ५९ या कार्यशील गटातील लोकसंख्येतही स्त्रियांचे प्रमाण कमी दिसते.
याउलट, स्थिरावलेल्या वयोगटात साधारणतः प्रत्येक वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांचे प्रमाण सारखेच दिसते. स्थिरावलेला वयोगट हा विकसित देशांचे प्रतिनिधित्व करतो. याचा अर्थ देशाचा आर्थिक, सामाजिक विकास आणि स्थिर लोकसंख्येचा वय लिंग मनोरा यांचा परस्परसंबंध दिसून येतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.
लोकसंख्या वाढ व स्थलांतर
विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते.
फरक स्पष्ट करा.
विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा.
लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा.
लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा.
आकृती काढून नावे द्या.
अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.
दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
- दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे?
- २०१६ मधील सहारा बाळवंटी प्रदेशातील स्त्री-पुरुष साक्षरता दरातील टक्केवारी कमी असण्याचे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाला अनुत्तम प्राधान्य आणि सामाजिक-आर्थिक अडचणी.
- आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा.
- आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?