Advertisements
Advertisements
प्रश्न
लोकसंख्या वाढ व स्थलांतर
उत्तर
सर्वसाधारणतः लोकसंख्या वाढ ही नैसर्गिक कारणांमुळे होताना दिसते. जेव्हा मृत्युदरापेक्षा जन्मदर जास्त असतो, तेव्हा त्या प्रदेशाची लोकसंख्या सर्वसाधारण पद्धतीने वाढताना दिसते. मात्र, लोकसंख्या वाढीमध्ये नैसर्गिक वाढ हा एकमेव घटक नाही. एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येत विशेषतः लोकसंख्या वाढीत स्थलांतरित घटकाचाही महत्त्वपूर्ण समावेश असतो.
स्थलांतरास घटक कारणीभूत असतात, यात प्रमुख प्राकृतिक, सामाजिक आणि राजकीय घटकांचा समावेश होतो. मात्र, या घटकांपेक्षाही स्थलांतरामागील प्रेरणा ही स्थलांतरास जास्त कारणीभूत असते. उत्तम हवामान, रोजगाराच्या आकर्षक संधी, उत्कृष्ट राहणीमानाचे आकर्षण, शहर दर्शन या प्रेरणा आकर्षण स्थलांतरास कारणीभूत ठरतात. त्याच वेळेस आपत्ती, राजकीय संघर्ष किंवा कलह, युद्ध, युद्धजन्य परिस्थिती, सामाजिक कलह, सामाजिक दंगे, वांशिक दंगे, उद्योगांची टाळेबंदी, साधनसंपत्तीचा तुटवडा, दुष्काळ यांसारख्या कारणांमुळे अपकर्षण स्थलांतर होते.
स्थलांतराच्या प्रक्रियेत स्थलांतरित देणारा प्रदेश आणि स्थलांतरीत घेणारा प्रदेश असे दोन प्रदेश समाविष्ट असतात. स्थलांतरित घेणाऱ्या प्रदेशात स्थलांतरामुळे लोकसंख्येत खूप वाढ होताना दिसते. प्रामुख्याने विविध महानगरे आणि विकसित देश आढळतात. अशा देशांची किंवा प्रदेशांची लोकसंख्या स्थलांतरामुळे वाढते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर.
लोकसंख्येची व्यावसायिक संरचना.
साक्षरतेचे प्रमाण.
विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते.
फरक स्पष्ट करा.
विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा.
लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा.
आकृती काढून नावे द्या.
अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.
दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
- दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे?
- २०१६ मधील सहारा बाळवंटी प्रदेशातील स्त्री-पुरुष साक्षरता दरातील टक्केवारी कमी असण्याचे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाला अनुत्तम प्राधान्य आणि सामाजिक-आर्थिक अडचणी.
- आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा.
- आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?