Advertisements
Advertisements
प्रश्न
माहितीपत्रकाची गरज विशद करा.
लघु उत्तर
उत्तर
- माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते. अगदी फळफळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यांपासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासतेच. दिवाळी फराळ, रेडिमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे, दूधदुभते, खाद्यपदार्थ इत्यादींची माहितीपत्रके पाहावयास मिळतात.
- नाट्यगृहे, सिनेमागृहे, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडासंस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, एलआयसी, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचतगट इत्यादी ठिकाणी माहितीपत्रकाची गरज असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?