Advertisements
Advertisements
प्रश्न
मुलाखतीचे विविध प्रकार थोडक्यात लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते. एकावेळी एक व्यक्ती दुसर्या एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते; तसेच एका वेळी एक व्यक्ती अनेक व्यक्तींचीही मुलाखत घेऊ शकते. फोनवरूनही मुलाखत घेतली जाऊ शकते.
मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपाची असते. मुलाखती विचारप्रवर्तक असतात, भावनाप्रधानही असतात. श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या, पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या... अशा कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती असतात.
व्यावसायिक मुलाखत, पत्रकारीय मुलाखत, संशोधन मुलाखत, प्रबोधनात्मक मुलाखत अशा प्रकारच्या मुलाखती असतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?