मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा.

माहितीपत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा.

लघु उत्तर

उत्तर

माहितीपत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते जपून ठेवणे ही उत्तम माहितीपत्रकाची ओळख असते. माहितीपत्रक नवनवीन योजना/सेवा/उत्पादने यांची सविस्तर माहिती ग्राहकांना देत असते. फळफळावळ आणि भाजीपाला विक्रेते यांपासून करोडो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. पुस्तके, स्टेशनरी, किराणामाल, दिवाळीअंक, घरगुती वापराची उपकरणे, अलिशान गाड्या अशा सर्वच उत्पादनाची माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. उत्पादनाच्या सोयी संदर्भातील शंकांचे निरसन माहितीपत्रक करीत असते. माहितीपत्रक योजना/सेवा/उत्पादन यांचा आरसा असतो. माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परंतु विश्वासार्ह असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात. त्याचा प्रचार करतात. उत्पादनाचे वैशिष्ट्य, वेगळेपणा, ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील, तिथे माहितीपत्रकाची भूमिका महत्त्वाची असते.

shaalaa.com
माहितीपत्रक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.02: माहि तीपत्रक - कृती [पृष्ठ ९७]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 4.02 माहि तीपत्रक
कृती | Q 4 | पृष्ठ ९७

संबंधित प्रश्‍न

माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.


माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा:
आकर्षक मांडणी.


‘माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी’ थोडक्यात स्पष्ट करा.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.


महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा.


एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा.


माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्टये’ लिहा:

माहितीपत्रक म्हणजे ______ माहितीला प्राधान्य ______ उपयुक्तता ______ लिखित माध्यम ______ भाषाशैली.


माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.


आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा.

आठवडी बाजाराचे माहितीपत्रकाचा उद्देश ______ त्यात कोणत्या ______ माहितीला प्राधान्य ______ आठवडी बाजार माहितीपत्रकाची उपयुक्कता ______ सरळ भाषाशैली.


‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा.


माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.


माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा.

सुसंगत व अचूक माहिती ______ उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ______ माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण ______ आकर्षक मांडणी व भाषाशैली ______ मनाला भिडणारी शब्दयोजना.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×