मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल?

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. मानवी जीवनाच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल. उदा. प्रतिकूल परिस्थितीतही शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेता येते. यांचे प्रमुख उदाहारण म्हणजे इस्त्रायल देशातील शेती हे होय.
  2. तसेच, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी खर्चात वस्त्रोत्पादन होईल, त्यामुळे वाजवी दरात उपलब्ध होणाऱ्या वस्त्राचा उपयोग सर्व स्तरांवरील लोकांना करता येईल.
  3. याशिवाय गृहनिर्माणाकरता वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे हवामानानुसार व प्राकृतिक रचनेनुसार निवाऱ्याची सोय करता येते. उदा. भूकंपप्रवण क्षेत्रातील जपान या देशामध्ये वारंवार येणारे भूकंप व त्सुनामी या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी वेगळ्या प्रकारची व वजनाने हलक्या स्वरूपातील घरे असतात, तसेच भूकंपाचा धक्का सहन करून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारच्या इमारतीची रचना तंत्रज्ञानामुळे करणे शक्य झाले आहे.
  4. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानवी कल्याणासाठी शिक्षण ही आज काळाची गरज झाल्याने उपग्रहांच्या साहाय्याने घरोघरी शिक्षण पोहोचवण्याचे काम तंत्रज्ञानामुळे शक्‍य झाले आहे. उदा, भारताने ''एज्युसॅट'' उपग्रहाच्या साहाय्याने शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
shaalaa.com
शीतयुद्ध
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - पाठ्यअंतर्गत प्रश्न [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2.1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
पाठ्यअंतर्गत प्रश्न | Q ६. | पृष्ठ ६०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×