Advertisements
Advertisements
प्रश्न
तंत्रज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांच्यात काही संबंध असतो का?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- तंत्रज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांच्यात संबंध आहे. तंत्रज्ञानासंबंधित प्रगती ही जगातील विकसित व काही विकसनशील देशांमध्ये झालेली आढळते, त्या तुलनेत अविकसित राष्ट्रे याबाबतीत मागे आहेत.
- बरेचदा विकासातील या असमतोलामुळे दहशतवादाची समस्या निर्माण होऊन जागतिक शांतता धोक्यात येते. उदा. आफ्रिका आणि आशिया खंडातील काही मागासलेले देश अशा मार्गांचा स्वीकार करत असतात.
- विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रांना त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तंत्रज्ञानाबाबत सहकार्य केल्यास अविकसित राष्ट्रांच्या विकासाच्या दृष्टीने हो गोष्ट महत्वपूर्ण ठरू शकते आणि जगामधे राष्ट्राष्ट्रांत सहकार्य व शांतता निर्माण होण्यास मदत होते.
- तसेच, तंत्रज्ञानाचा शांततेसाठी योग्य वापर करणे हे देखील महत्त्वाचे आहे.
- उदा. अणुऊ्जेंचा उपयोग उदघोगांसाठी इंधन, म्हणून करता येतो. याचा विचार आण्विक शक्तीची निर्मिती केलेल्या देशांनी केल्यास जगात शांतता निर्माण होऊ शकते.
shaalaa.com
शीतयुद्ध
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?