Advertisements
Advertisements
प्रश्न
महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- १९३९ मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीय जनतेला विश्वासात न घेता दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडबरोबर युद्धात उतरत असल्याची घोषणा केली; मात्र या गोष्टीला भारतीयांनी विरोध केला.
- शांततामय व अहिंसेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करण्याच्या हेतूने गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण येऊन देशात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली,
- सर्व राजकीय पक्षांनी “क्रिप्स योजना' फेटाळल्याने व ब्रिटिश शासन युद्धात गुंतल्याने भारताला कोणत्याही राजकीय सुधारणा नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता नव्हती. गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी भारतीयांना “करा किंवा मरा' असा संदेश देऊन 'चले जाव' आंदोलन सुरू केले.
- हे आंदोलन जरी अयशस्वी झाले तरी ब्रिटिशांना भारतीय जनतेतील असंतोष कळला आणि भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग अधिक सोपा झाला.
shaalaa.com
जागतिक युद्धाची पार्श्वभूमी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ______.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.
पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
मुद्दे | पहिले महायुद्ध | दुसरे महायुद्ध |
१. कालखंड | ||
२. सहभागी राष्ट्रे | ||
३. परिणाम - (राजकीय व आर्थिक) | ||
४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना |
युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला. परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या?
जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकूमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकूमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
१९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या?