Advertisements
Advertisements
प्रश्न
युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला. परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- युरोपमध्ये निर्माण झालेला आक्रमक राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद यांकडे आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून राष्ट्रसंघाने गांभीर्याने पाहून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा उपाय करायला हवे होते.
- राष्ट्रांमधील सहकार्याबाबत विश्वास निर्माण करावयास हवे होते.
- अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राचा राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वासाठी होकार मिळवून जपान, जर्मनी, इटली, सोव्हिएत युनियन या राष्ट्रांना राष्ट्रसंघातून बाहेर पडू न देता एकत्रित बांधून ठेवण्याबाबत उपाय करायला हवे होते कारण ही राष्ट्रे राष्ट्रसंघातून बाहेर पडल्यामुळे त्यांचा संपूर्ण व क्रियाशील सहभाग राहिला नाही. परिणामी, सामुदायिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. राष्ट्रसंघाने करारनाम्याचा भंग करणाऱ्या सदस्यावर आपले निर्णय लादण्यासाठी आवश्यक असलेले लष्करी बळ वाढवण्याबाबतचे उपाय करायला हवे होते.
- अशारीतीने, राष्ट्रसंघाने जगातील राष्ट्रांमध्ये एकजुटी व सहकार्य, शांततामय संबंध यादृष्टीने प्रयत्न करणे म्हणजेच दुसरे महायुद्ध टाळण्याचे उपाय करणे आवश्यक होते.
shaalaa.com
जागतिक युद्धाची पार्श्वभूमी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ______.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.
पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
मुद्दे | पहिले महायुद्ध | दुसरे महायुद्ध |
१. कालखंड | ||
२. सहभागी राष्ट्रे | ||
३. परिणाम - (राजकीय व आर्थिक) | ||
४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना |
जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकूमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकूमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
१९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या?
महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला?