मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा: तात्कालिक कारण - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा:

तात्कालिक कारण

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. ऑस्ट्रियन राजपुत्र आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड आणि त्याची पत्नी यांचा सर्बियात एका सर्बियन माथेफिरूने खून केला. या प्रकरणात सर्बियाचा हात असावा, अशी ऑस्ट्रियाची खात्री होती. त्यामुळे ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  2. तेव्हा रशिया सर्बियाच्या मदतीला धावून गेला. या दोन लढाऊ राष्ट्रांची बाजू युरोपातील अनेक बड्या राष्ट्रांनी घेतली. ऑस्ट्रिया, हंगेरी यांनी सर्बियाविरुद्ध दडपशाही आरंभली. जर्मनीने ऑस्ट्रियाची बाजू घेतली. बेल्जियम हा देश तटस्थ होता.
  3. तरीही जर्मनीने बेल्जियमवर हल्ला करून तो देश आपल्या वर्चस्वाखाली आणला. इंग्लंडने बेल्जियमला पाठिंबा दिला. इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  4. जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्थान, बल्गेरिया ही अक्ष राष्ट्रे एका बाजूस आणि इंग्लंड, फ्रान्स, रशिया ही दोस्त राष्ट्रे दुसऱ्या बाजूस, असे दोन गट पडले.
  5. पुढे इटली दोस्त राष्ट्रांच्या गटात सामील झाला. महायुद्धाच्या अखेरच्या काळात अमेरिका युद्धात सहभागी झाली.
shaalaa.com
पहिल्या महायुद्ध (इ.स. १९१४ ते १९१८)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा ______ देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.


पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. अमेरिका

- वुड्रो विल्सन

२. इंग्लंड

- विन्स्टन चर्चिल

३. जर्मनी

- हिटलर

४. इटली

- लिनलिथगो


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट - ______


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्थान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट - ______


टीप लिहा.

राष्ट्रसंघ


पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा:

साम्राज्यवादी धोरण


पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा:

शस्त्रवाढ स्पर्धा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×