Advertisements
Advertisements
प्रश्न
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर
प्राणी जगतातील अनेक पशूंना निसर्गाने एक आगळेवेगळे वरदान दिले आहे, ते म्हणजे गंधज्ञान. सर्व सस्तन प्राण्यांना गंधज्ञान अवगत असते. काहींमध्ये ते तीव्र व अधिक प्रभावी असते, तर काही पशूंमध्ये ते अगदी सामान्य पातळीवर कार्यरत असते. आपल्या आसपास आढळणाऱ्या कुत्रा, मांजर, उंदीर, ससा, गाई, म्हशी, हत्ती, घोडा यांसारख्या अनेक प्राण्यांना विविध गोष्टींचा गंध हुंगून ज्ञान मिळवता येते. मांसाहारी प्राणी शिकार करण्याकरता भक्ष्य प्राण्याचा गंध हुंगतात. काही प्राणी धोकादायक वस्तू, कीटक यांचा गंध हुंगून स्वत:चे रक्षण करतात. या बाबतीत कुत्रा हा प्राणी चाणाक्ष असतो. त्याच्या प्रभावी घाणेंद्रियानी तो कितीही दूरवरचा सूक्ष्म गंध हुंगून सर्वांना सावध करतो. याच कारणासाठी बॉम्बशोध पथकांमध्ये कुत्र्यांचा समावेश केला जातो. तसेच, घराची राखण करण्याच्या कामीही त्याची मदत होते. अशाप्रकारे, प्राण्यांचे गंधज्ञान हे निसर्गाने त्यांना दिलेले एक वरदान आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.
भौगोलिक वैशिष्ट्ये
टीपा लिहा.
वैजयंती
टीपा लिहा.
गायबगळे
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
टिपा लिहा.
ग्रँड कॅनॉल
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.
(१) ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
(२) एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण....’
(३) तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक(देशभक्त).
(४) ‘सुधारक’ चे संपादक.
(५) कवी यशवंत यांचे आडनाव.
(६) विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
(७) मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
(८) कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.