मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.

लघु उत्तर

उत्तर

व्हेनिस या शहरात खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. फक्त प्रचंड मोठ्या आकाराचे कालवे आणि त्यांना जोडणारे पूल आहेत, त्यामुळे या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावरची धक्काबुक्कीही नाही. या सर्व गोष्टी असणारे जगातले हे एकमेव शहर आहे. खरे म्हणजे रूढ अर्थाने हे शहरच नव्हे, तर हा अनेक छोट्या बेटांचा पुंजका आहे, जो दुरून निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा दिसतो. येथे वाहनांची नव्हे, तर नावांची ये-जा असते. किनाऱ्यावरून संथपणे सरकणाऱ्या प्रवाशांच्या नावांची येथे वर्दळ असते. कोणालाही कसलीच घाई-गर्दी नसते, त्यामुळे हे शहर म्हणजे निवांतपणा, उत्साह व उत्सव असल्याचे लेखकास वाटते.

shaalaa.com
स्थूल वाचन (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12.2: व्हेनिस - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Marathi 9 Standard Maharashtra State Board
पाठ 12.2 व्हेनिस
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ४६

संबंधित प्रश्‍न

काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा.

प्राणिजीवन


‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.


‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.


टीपा लिहा.

वैजयंती


टीपा लिहा.

गेंड्याच्या सवयी


टीपा लिहा.

गायबगळे


‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.


टिपा लिहा.

व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर


खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.

(१) ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
(२) एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण....’
(३) तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक(देशभक्त).
(४) ‘सुधारक’ चे संपादक.
(५) कवी यशवंत यांचे आडनाव.
(६) विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
(७) मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
(८) कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.


टीप लिहा.

विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया 


‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.


विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.


केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.


विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×