Advertisements
Advertisements
प्रश्न
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
जोडणारे दुवे
उत्तर
काही सजीवांत अशी शारीरिक लक्षणे असतात की, ती लक्षणे दोन वेगळ्या गटांतील सजीवांत आढळून येतात. दोन वेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदा.,
- पेरीपॅटस:
पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. ॲनेलिडा व संधिपाद या दोन्ही अपृष्ठवंशीय प्राणी संघाची वैशिष्ट्ये हा प्राणी दर्शवतो. ॲनेलिडा किंवा वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव आणि संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था या प्राण्यात आढळते. - डकबिल प्लॅटिपस:
हा प्राणी सरिसृप आणि सस्तन वर्ग यांना जोडणारा दुवा आहे. सरिसृप प्राण्यांप्रमाणे हा अंडी घालतो; परंतु सस्तन प्राण्यांप्रमाणे याच्यात दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात. - लंगफिश:
हा मत्स्य आणि उभयचर या वर्गांना जोडणारा दुवा आहे. तो मासा असूनही फुप्फुसांद्वारे श्वसन करतो. - या जोडणाऱ्या दुव्यांवरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज येतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.
मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.
जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.
प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून __________ विषयक पुरावे दिसून येतात.
मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?
आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________
खालील आकृती पूर्ण करा.
मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.