मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

परिणाम लिहा - (१) माणसं अस्वस्थ, उदास होतात तेव्हा - (य) ........... (र) ............  (२) पुढील रिकाम्या जागा पूर्ण करा - (य) खेळाचा आणि छंदाचा उद्देश्य - ______ (र) पोटापाण्यासाठी करतात तो - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतार्‍याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

परिणाम लिहा -

(१) माणसं अस्वस्थ, उदास होतात तेव्हा -    [2]

(य) ...........

(र) ............ 

(२) पुढील चौकटी पूर्ण करा -    [2]

(य) खेळाचा आणि छंदाचा उद्देश्य - ______

(र) पोटापाण्यासाठी करतात तो - ______

शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पाहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ. माणसं स्वत:ची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकं हे साधं गणित आहे आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं... कसलं कसलं वेड घेतात लोक डोक्यात; पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल, तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी 'शहाणंसुरतं' राहून जमत नाही.

शहाणंसुरतं राहायचं असेल, तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिच्चून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काहीजण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात, त्यादृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं..

(३) स्वमत अभिव्यक्ती -    [4]

'आनंद हवा असेल, तर थोडं वेडं व्हावंच लागतं', - या विधानाची साधक-बाधक चर्चा तुमच्या शब्दांत करा.

किंवा

'छंदातून आनंद प्राप्ती होत असते', याबाबत तुमचे अनुभव व्यक्त करा.    [4]

आकलन

उत्तर

(१) माणसं अस्वस्थ, उदास होतात तेव्हा -    

(य) परमेश्वराचा धावा करतात.

(र) आवडीचं पुस्तक वाचतात.

(२) 

(य) खेळाचा आणि छंदाचा उद्देश्य - आनंद

(र) पोटापाण्यासाठी करतात तो - उद्योग

(३) 

प्रत्येक सजीव हा जन्माला आल्यानंतर जगतोच. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासाठी आपण मेहनत घेतो. मी, आम्ही आणि आपण या संकल्पनांमधून समाजाची निर्मिती होते. मात्र, केवळ उदरनिर्वाह म्हणजे जीवन नव्हे. जीवनाची खरी पूर्तता हा अक्षय आनंदात आहे. स्वतः आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे हेच जीवनाचे खरे सार आहे. कलेचा आनंद घेणे किंवा एखादी कला आत्मसात करणे, यातून मिळणारा आनंद आपले जीवन अधिक समृद्ध करतो. भूदान चळवळीचे प्रणेते पूज्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे – “आनंद शोधण्यासाठी बाहेर भटकू नका. तुम्हीच आनंदाचे भांडार आहात. तुमच्यातील आनंद शोधा.” त्यामुळे प्रत्येकाने एखादा छंद जोपासला पाहिजे. त्या छंदात स्वतःला एकरूप करणे हे जीवन अधिक अर्थपूर्ण करण्याचे रहस्य आहे. याचा अर्थ असा की, खरा आनंद मिळवायचा असेल, तर आपल्याला सकारात्मक वेडेपणा असायला हवा. उदरनिर्वाहासाठी उद्योग करणे आणि पैसा कमावणे हे जगण्यासाठी आवश्यक आहे; पण जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी छंद जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी वेगळा दृष्टिकोन ठेवणे म्हणजेच सकारात्मक वेडे होणे आवश्यक ठरते.

किंवा

मी पाचवीत असताना माझ्या वडिलांनी घरी एक कुत्र्याचे पिल्लू आणले. त्याला पाहून मला अपार आनंद झाला. मी त्याचे नाव "टॉम" ठेवले. तो घरभर धावत असे, मध्येच थांबत असे, पुन्हा उड्या मारत खेळत असे. मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवत असे. तो फेकलेला चेंडू तोंडात धरून पुन्हा माझ्याकडे आणून द्यायचा. त्याच्यासोबत खेळण्यात मला खूप मजा येत असे. एका दिवशी मला कल्पना सुचली की, टॉमचे चित्र काढून त्यालाच दाखवावे. मी कोऱ्या कागदावर त्याचे रेखाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. त्याला पाहत-पाहत रेषा काढू लागलो, पण तो एका जागी शांत बसत नसे. त्यामुळे त्याचे चित्र नीट रेखाटता येत नव्हते. तरीही मी हार मानली नाही. माझ्या मनात त्याचे अस्तित्व ठसलेले होते, म्हणून मी आठवणींवरून त्याची अनेक चित्रे काढली. हळूहळू मला "टॉम" रेखाटण्याचा छंद जडला. काळाच्या ओघात माझ्या रेखाचित्रात सुधारणा होत गेली. आता मी बारावीत आहे आणि आतापर्यंत मेयोच्या विविध टप्प्यांतील असंख्य चित्रे माझ्याकडे आहेत. एकदा मी ती आमच्या मराठीच्या शिक्षकना दाखवली. त्यांनी त्याची खूप प्रशंसा केली. माझ्या चित्रांचे कौतुक करत त्यांनी ती शाळेच्या वार्षिक अंकात छापण्यासाठी दिली. संपूर्ण शिक्षकवर्गाने मला शाबासकी दिली आणि स्नेहसंमेलनात माझा गौरव करण्यात आला. हे माझ्यासाठी अतिशय आनंददायक क्षण होते. मी जोपासलेल्या छंदाची परिणती अक्षय आनंदात झाली. टॉमचे चित्र काढता काढता मला इतरही रेखाचित्रे काढण्याची आवड निर्माण झाली. आता मी निसर्गचित्रेही काढू लागलो आहे. हा छंद म्हणजे माझ्या आयुष्यभराची अमूल्य कमाई आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×