Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
- भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष दोन प्रश्नांशी निगडित आहे. (१) सीमाप्रश्न आणि (२) तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे.
- चीनचा दावा आहे की, अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश (अरुणाचल प्रदेश) हा चीनचा भूप्रदेश आहे. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही. हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले. परंतु त्यास फारसे यश आले नाही.
- चीन त्या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत असल्याने तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात राजाश्रय घेतला. ही बाब दोन्ही देशांतील संघर्षाला कारणीभूत ठरली आहे.
shaalaa.com
भारत आणि शेजारी राष्ट्रे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?