Advertisements
Advertisements
प्रश्न
पुरवठ्याचा नियम सविस्तर स्पष्ट करा.
उत्तर
आर्थिक सिद्धांतात जसे मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा हा नियमसुद्धा मूलभूत नियम आहे. प्रा. आल्फ्रेड मार्शल यांनी सन १८९० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘अर्थशास्त्राची मूलतत्त्वे’ या पुस्तकात मागणी नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियमही मांडला आहे. या नियमाद्वारे किंमत व पुरवठा यांतील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे.
पुरवठ्याचा नियम:
‘‘इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादानगसंख्येचापुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो.’’ दुसऱ्या शब्दात इतर घटक स्थिरअसताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो, तर किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. अशा प्रकारेनगसंख्या आणि किंमत यांचा सम संबंध असतो. किंमत व पुरवठा यांतील सहसंबंध खालील प्रकारेस्पष्ट करता येतो.
Sx = f (Px)
जिथे, S = पुरवठा
x = वस्तू
f = फलन
P = किंमत