मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुरवठा नियमाची गृहीतके सविस्तर स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुरवठा नियमाची गृहीतके सविस्तर स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

पुरवठ्याचा नियम हा खालील गृहीतकांवर आधारित आहे.

  1. स्‍थिर उत्‍पादन खर्च: उत्‍पादन खर्चात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. कारण उत्‍पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्‍याच्या नफ्यात बदल होईल आणि त्‍याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल.
  2. स्‍थिर उत्‍पादन तंत्र: उत्‍पादन तंत्रात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. सुधारित तंत्रामुळे उत्‍पादनात वाढ होते. त्‍याच किमतीला पुरवठा वाढतो.
  3. हवामानाच्या स्‍थितीत बदल नाही: हवामानाच्या स्‍थितीत बदल होत नाही हे गृहीत धरले आहे. पूर, भूकंप, दुष्‍काळ अशा नैसर्गिक आपत्‍तींमुळे पुरवठा घटू शकतो.
  4. सरकारी धोरणात बदल नाही: सरकारच्या व्यापार विषयक व कर विषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे.
  5. वाहतूक खर्चस्‍थिर: वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा यांत कोणताही बदल होत नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे. उदा., चांगल्‍या वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल.
  6. इतर वस्‍तूंच्या किमती स्‍थिर: इतर वस्‍तूंच्या किमती स्‍थिर आहेत असे गृहीत धरण्यात आले आहे. जर इतर वस्‍तूंच्या किमतीत बदल झाला तर उत्‍पादक उत्‍पादन घटकांचा वापर इतर वस्‍तूंच्या उत्‍पादनासाठी करेल.
  7. भविष्‍यकालीन किमतीचा अंदाज नाही: भविष्‍यकाळात वस्‍तूंच्या किमतीत होणाऱ्या बदला विषयी उत्‍पादक विक्रेत्‍याला कोणताही अंदाज करता येत नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे.
shaalaa.com
पुरवठ्याचा नियम
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×