मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते?

थोडक्यात उत्तर

उत्तर

रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण असते. पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात.

रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे:

  1. कार्बनन: पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात.
  2. द्रवीकरण: मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात.
  3. भस्मीकरण: ज्या खडकांत लोहखनिज असते, त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो.
shaalaa.com
रासायनिक विदारण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: बाह्यप्रक्रिया भाग-१ - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 3 बाह्यप्रक्रिया भाग-१
स्वाध्याय | Q 1. (आ) | पृष्ठ २९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×