मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा! - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

(1) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा:   (2)

  1. सर्वांमध्ये मिसळून माझे वेगळेपण जपतो.
    काव्यओळ ......................
  2. आयुष्याने माझीच का बरे फसगत केली.
    काव्यओळ ......................

(2) एका शब्दात उत्तरे लिहा.   (2)

  1. कवीसवें राहणारी - ......
  2. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा - ......

(3) अभिव्यक्ती:   (4)

समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, सोदाहरण स्पष्ट करा.

आकलन

उत्तर

(1) 

  1. काव्यओळ: रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
    गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
  2. काव्यओळ: अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

(2) 

  1. कवीसवें राहणारी - आसवे
  2. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा - सूर्य

(3) 

जीवनाचे खरे यश मिळवण्यासाठी, प्रत्येकाच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय असणे आवश्यक आहे. त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी निष्ठा आणि व्रतस्थ वृत्ती हवी. मात्र, या प्रवासात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी अपार मेहनत घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवली पाहिजे, कारण त्यामुळे समाजात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते. कर्तृत्व हेच खऱ्या माणुसकीचे प्रतीक आहे.

सामाजिक बांधिलकी ही प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेली असावी. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय बाबा आमटे. त्यांनी वकिलीचा त्याग करून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली आणि "आनंदवन" उभारले. त्यांच्या कार्यामुळे समाजात त्यांचे वेगळेपण अधोरेखित झाले. तसेच, गाडगे महाराजांनी आपले घरदार सोडून स्वच्छता अभियान एकहाती पार पाडले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून लोकांच्या मनातील विवेक जागवला. यामुळेच आज गाडगे महाराज आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांच्या वंदनीय ठरले आहेत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×