Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनुसार कृती करा.
फिरण्याच्या व्यायामामुळे आपले स्नायू आपले होतात, खुलतात. आपल्याशी संवाद करायला लागतात. आपल्या शरीराशी त्यांचं तुटलेलं नातं पुन्हा जुळतं. शरीराचा सूर लागतो. चालताना पावलांची लय श्वासासोबत जोडायची. तीन पावलं श्वास घ्यायचा, चार पावलं सोडायचा. श्वास, पावलं, शरीर व मन सर्व एका लयीत येतात. चालण्याचं एक गाणंच होतं! सोबतचं बाहेर दिसणारं विश्वदेखील विलक्षण परिणाम करून जातं. उंच झाडं, दूरवरचे ढग, लांबचं क्षितिज यांमुळे नजरेचा विस्तार वाढतो, तिला विशालतेचं परिमाण मिळतं. सहसा आपल्या नजरेचा विस्तार ऑफिसच्या केबिनचं दार, लोकलच्या डब्याच्या भिंती किंवा बेडरूमचं छत यांनी मर्यादित होतो. इन-मिन पंधरा फुटांचं क्षितिज ! हळूहळू मनही पंधरा फुटांनी मर्यादित होत असावं. फिरायला गेल्यावर अवघं जंगल, अवघं आकाश, अवघा सूर्य आपल्या डोळ्यांच्या कवेत येतो. डोळ्यांचं क्षितिज विस्तारतं. हळूहळू मनाच्या क्षितिजात हे सर्व विश्व मावायला लागतं - तेवढ्या क्षणांपुरतं का होईना! |
(१) कृती करा: (२)
फिरण्याच्या व्यायामाचे दोन परिणाम –
(य) ……………
(र) ……………
(२) चौकट पूर्ण करा: (२)
चालताना एका लयीत येणारे घटक:
उत्तर
(१)
(य) स्नायू मोकळे आणि सुदृढ होतात.
(र) शारीरिक तणाव दूर होतो.
(२)
पावले | श्वास | शरीर | मन |