मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

रसग्रहण: सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:“चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !”माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ! - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

रसग्रहण:

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
“चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !”
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

वरील ओळींचे रसग्रहण करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

आशयसौंदर्य: समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी. कलंदर माणूस आहे. असे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलामधून सुरेश भट हे मांडतात दुःखातही पीडितांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार कवीने व्यक्त केला आहे.

काव्यसौंदर्य: उपरोक्त ओळी कवी असा मांडतो की चारीबाजूंनी या दिशा ही माणसे मनाला जीवनाचे सार लागतात आणि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणतो आणि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणतो. ढोंगी माणसांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केलेली आहे. जिथे अंधार, दारिद्र्याचा काळोख आहे. अशा नैराश्येच्या काळ्या मध्यरात्री, सर्वत्र तळपणारा मी सूर्य आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी माझ्या स्वार्थासाठी कधीही पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाही.

भाषासौंदर्य: सुरेश भटांच्या या कवितेत गझल हे मात्रावृत्त आहे. या रचनेत अंत्य यमकाचा रदीफ ठळकपणे वापरला आहे. ‘सावल्यांचा झळा’, ‘दुःखाचा लळा’ आणि ‘मध्यरात्रीचा सूर्य’ यांसारख्या प्रतिमा वेगळ्या आणि नवीन आहेत. तडफदार आणि ओजस्वी शब्द तसेच शब्दांची ठोस पकड यांमुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते.

shaalaa.com
रंग माझा वेगळा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

अर्थ ओळ
सर्वांमध्येमिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. ____________

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

अर्थ ओळ
मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो. ____________

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

अर्थ ओळ
हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे? ____________

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

अर्थ ओळ
आयुष्याने माझीच का बरे फसगत केली? ____________

कृती करा.

कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष


योग्य जोड्या लावा.

'अ' गट ‘ब’ गट
(१) माणसांची मध्यरात्र (अ) नैराश्यातील आशेचा किरण
(२) मध्यरात्री हिंडणारा सूर्य (आ) इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्
(३) माझा पेटण्याचा सोहळा (इ) माणसांच्या आयुष्यातील नैराश्य

एका शब्दात उत्तर लिहा.

कवीची सदैव सोबत करणारी ...........


एका शब्दात उत्तर लिहा.

कवीचा विश्वासघात करणारे ...........


एका शब्दात उत्तर लिहा.

खोट्या दिशा सांगतात ...........


एका शब्दात उत्तर लिहा.

माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा .............


खालील ओळींचा अर्थलिहा.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!


खालील ओळींचा अर्थलिहा.

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!


काव्यसौंदर्य.

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.


रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!


अभिव्यक्ती.

‘समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’, सोदाहरण स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’, असे कवी स्वत:बाबत का म्हणताे ते लिहा.


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!

गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;

मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;

हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों

अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा;

‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी;

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

(१) पुढील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. (2)

  1. सर्वामध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपणा जपतो.
  2. हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटते.

(२) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (2)

(अ) कवीची सदैव सोबत करणारी, म्हणजे ______.

(i) सूर्य
(ii) आसवे
(iii) दुःख
(iv) त्रास

(ब) कवीचा विश्वासघात करणारे, म्हणजे ______.

(i) आयुष्य
(ii) तात्पर्य
(iii) लळा
(iv) प्रेम

(३) अभिव्यक्ती- (४)

‘समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

(१) (2)

(i)

(ii)

  1. कवीची सदैव सोबत करणारी
  2. कवीची विश्वासघात करणारे

(२) (2)

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!”

या ओळींचा अर्थ लिहा.

(३) अभिव्यक्ती: (4)

‘समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’ सोदाहरण स्पष्ट करा.


कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा :
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×