मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

सार्वजनिक उद्योग. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सार्वजनिक उद्योग.

टीपा लिहा

उत्तर

उद्योगाचे विविध प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यांपैकी मालकीच्या आधारे उद्योगांचे वर्गीकरण केल्यास सार्वजनिक उद्योग, खाजगी उदयोग, सहकारी उद्योग, संमिश्र उद्योग असे विविध प्रकार आढळतात.
त्यांपैकी सार्वजनिक उदयोग हे एक महत्त्वाचे वर्गीकरण आहे. जे उदयोग पूर्णतः राज्य किंवा केंद्र शासनाच्या मालकीचे असतात. म्हणजे ज्या उदयोगात भांडवलाची गुंतवणूक ही पूर्णतः सरकारची असते, अशा उद्योगांना सार्वजनिक उदयोग म्हणतात. आर्थिक विकासाच्या सुरुवातीला कमी आर्थिक बळामुळे खासगी गुंतवणूक कमी होते, अशा वेळेस सरकारलाच गुंतवणूक करून उदयोगांना प्रोत्साहन दयावे लागते. त्याचबरोबर काही उद्योगांमध्ये नफाक्षम कालावधी सुरू होण्याचा काळ हा खूप दीर्घ असतो. इतका वेळ थांबण्याची तयारी खासगी उद्योजकांचे नसते. त्यामुळेही अशा उद्योगात सार्वजनिक क्षेत्राला उतरावे लागते. संरक्षण, रेल्वे, पेट्रोकेमिकल्स अशा काही महत्त्वपूर्ण उद्योगात सरकारही सुरुवातीस खाजगी क्षेत्रात खुली सूट देऊ इच्छित नाही. अशा विविध कारणांमुळे अनेक देशांत सार्वजनिक उद्योग आढळतात. लोह-पोलाद उदयोग, बहुउद्देशीय धरण बांधणी, वीजनिर्मिती प्रकल्प, रेल्वे वाहतूक बांधणी, दळणवळण, संदेशवहन, संरक्षण साहित्य व दारुगोळा उत्पादने इत्यादी उदयोग हे प्रामुख्याने सार्वजनिक उदयोग असतात. मात्र जगातील बहुतांश देशांनी आता या उद्योगातही खाजगी क्षेत्राला सामावून घेण्याचे धोरण अवलंबलेले दिसते.

shaalaa.com
उद्योगांचे वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: द्वितीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 5 द्वितीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ४. २) | पृष्ठ ५४

संबंधित प्रश्‍न

साखळी पूर्ण करा.

'अ' 'ब' 'क'
लघुउद्योग हाताने निर्मिती उद्योग चिनी मातीची भांडी बनवणे
कुटीरोद्योग कौशल्यावर आधारित टाटा लोह-पोलाद उदयोग
ग्राहकोपयोगी वस्तू वैयक्तिक कुंभार
खाजगी थेट वापरासाठी तयार औषधनिर्मिती

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.


अनुमापी अनुकूलता.


फरक स्पष्ट करा.

वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग


फरक स्पष्ट करा.

अवजड उदयोग आणि हलके उद्योग.


साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.


लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात.


कृषीवर आधारित उद्योग ओळखा.


पुढील चुकीचा घटक ओळखा.

खनिजावर आधारित उद्योग -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×