मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग

फरक स्पष्ट करा

उत्तर

  वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग
(१) ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन हे मूळ कच्च्या मालापेक्षा कमी होते, त्यांना वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग म्हणतात.  ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन हे मूळ कच्च्या मालापेक्षा जास्त होते, त्यांना वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग म्हणतात.
(२) अशा उद्योगांना घटणाऱ्या वजनाचे उद्योग असेही म्हणतात. अशा उद्योगांना वाढणाऱ्या वजनाचे उद्योग असेही म्हणतात.
(३) बहुतांशी धातुउद्योग हे वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग असतात. बहुतांश अन्नप्रक्रिया उद्योग, तयार खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग आणि बेकरी उदयोग हे वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग असतात.
(४)   लोहखनिजावर प्रक्रिया केल्यावर त्यापासून मिळणारे पोलाद हे मूळ लोहखनिजाच्या वजनापेक्षा कमी वजनाचे मिळते. उदा., उत्तम प्रतीच्या एक टन लोहखनिजावर प्रक्रिया केल्यावर त्यापासून सुमारे ४०० किलो पोलाद मिळते. गहू या कच्च्या मालापासून पाव, केक असा पक्का माल तयार केल्यास त्याचे वजन वाढते. फळांवर प्रक्रिया करून त्यापासून सरबते, जॅम, मुरांबे तयार करणे व ते काचेच्या बाटल्यांमध्ये भरणे या प्रक्रियेत पक्क्या मालाचे वजन वाढते.
(५)  त्यामुळेच बहुतांश धातुउद्योग हे खनिज उत्पादक खाणकाम क्षेत्राजवळच आढळतात. त्यामुळे असे वजनाने जड होणारे पक्क्या मालाचे उद्योग परिस्थितीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी उभारले जातात.
(६) त्यामुळे कच्च्या मालाच्या वाहतुकीवर होणारा जास्त खर्च टाळून केवळ पक्का माल थेट बाजारपेठेपर्यंत नेला जातो. फळे ही नाशवंत कच्चा माल असल्यामुळे अन्नप्रक्रिया उदयोग फळांच्या उत्पादक प्रदेशातच स्थापन केला जातो.
shaalaa.com
उद्योगांचे वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: द्वितीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 5 द्वितीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ५. १) | पृष्ठ ५४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×