Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग
Distinguish Between
Solution
वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग | वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग | |
(१) | ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन हे मूळ कच्च्या मालापेक्षा कमी होते, त्यांना वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग म्हणतात. | ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन हे मूळ कच्च्या मालापेक्षा जास्त होते, त्यांना वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग म्हणतात. |
(२) | अशा उद्योगांना घटणाऱ्या वजनाचे उद्योग असेही म्हणतात. | अशा उद्योगांना वाढणाऱ्या वजनाचे उद्योग असेही म्हणतात. |
(३) | बहुतांशी धातुउद्योग हे वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग असतात. | बहुतांश अन्नप्रक्रिया उद्योग, तयार खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग आणि बेकरी उदयोग हे वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग असतात. |
(४) | लोहखनिजावर प्रक्रिया केल्यावर त्यापासून मिळणारे पोलाद हे मूळ लोहखनिजाच्या वजनापेक्षा कमी वजनाचे मिळते. उदा., उत्तम प्रतीच्या एक टन लोहखनिजावर प्रक्रिया केल्यावर त्यापासून सुमारे ४०० किलो पोलाद मिळते. | गहू या कच्च्या मालापासून पाव, केक असा पक्का माल तयार केल्यास त्याचे वजन वाढते. फळांवर प्रक्रिया करून त्यापासून सरबते, जॅम, मुरांबे तयार करणे व ते काचेच्या बाटल्यांमध्ये भरणे या प्रक्रियेत पक्क्या मालाचे वजन वाढते. |
(५) | त्यामुळेच बहुतांश धातुउद्योग हे खनिज उत्पादक खाणकाम क्षेत्राजवळच आढळतात. | त्यामुळे असे वजनाने जड होणारे पक्क्या मालाचे उद्योग परिस्थितीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी उभारले जातात. |
(६) | त्यामुळे कच्च्या मालाच्या वाहतुकीवर होणारा जास्त खर्च टाळून केवळ पक्का माल थेट बाजारपेठेपर्यंत नेला जातो. | फळे ही नाशवंत कच्चा माल असल्यामुळे अन्नप्रक्रिया उदयोग फळांच्या उत्पादक प्रदेशातच स्थापन केला जातो. |
shaalaa.com
उद्योगांचे वर्गीकरण
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
साखळी पूर्ण करा.
'अ' | 'ब' | 'क' |
लघुउद्योग | हाताने निर्मिती उद्योग | चिनी मातीची भांडी बनवणे |
कुटीरोद्योग | कौशल्यावर आधारित | टाटा लोह-पोलाद उदयोग |
ग्राहकोपयोगी वस्तू | वैयक्तिक | कुंभार |
खाजगी | थेट वापरासाठी तयार | औषधनिर्मिती |
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.
सार्वजनिक उद्योग.
अनुमापी अनुकूलता.
फरक स्पष्ट करा.
अवजड उदयोग आणि हलके उद्योग.
साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात.
कृषीवर आधारित उद्योग ओळखा.
पुढील चुकीचा घटक ओळखा.
खनिजावर आधारित उद्योग -