English

खालील संक्षिप्त टिप लिहा: वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील संक्षिप्त टिप लिहा:

वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका.

Short Note

Solution

  1. कच्चा माल उदयोगधंद्यांच्या ठिकाणी आणण्यासाठी व तयार झालेल्या पक्का माल बाजारपेठेत पाठवण्यासाठी वाहतूक आवश्यक असते.
  2. वाहतुकीच्या खर्चाचा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर व विकासावर परिणाम होतो. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग हे वाहतुकीचे मार्ग आहेत.
  3. या सर्व मार्गात जलमार्गाने होणारी वाहतूक कमी खर्चाची असते. त्यामुळेच धातू, खनिजे, कोळसा, कच्चे खनिज तेल यांची वाहतूक प्रामुख्याने जलमार्गाद्वारे केली जाते.
  4. साहजिकच अनेक उदयोग हे नैसर्गिक बंदरांजवळ स्थायिक झालेले दिसतात. असाच प्रभाव देशांतर्गत उदयोगांच्या स्थानिकीकरणावर होताना दिसतो.
  5. जेथे अंतर्गत जलवाहतूक उपलब्ध आहे, तेथे उदा., पंचमहासरोवरांचा प्रदेश उद्योगाच्या विकासावर खूप मोठा प्रभाव पडतो, जलमार्ग नंतर लोहमार्ग हे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर आणि विकासावर प्रभाव पाडतात. 
  6. विशेषतः जेथे दोन किंवा अधिक रेल्वेमार्ग एकत्र येतात अशा रेल्वेजंक्शनजवळ उदयोग स्थायिक झालेले आढळतात.
  7. जेणेकरून त्या उदयोगांना लागणारा सर्व प्रकारचा कच्चा माल, मनुष्यबळ, यंत्रसामग्री सहजतेने त्याठिकाणी पोहोचते.
  8. उद्योगातून सामान बाजारपेठेपर्यंत लवकरात लवकर जाणेही आवश्यक असते. 
  9. त्यामुळेच उद्योग आणि बाजारपेठ यांमधील वाहतुकीच्या सेवांचा विकासही तितकाच महत्त्वाचा असतो.
shaalaa.com
द्वितीयक आर्थिक क्रियावर परिणाम करणारे - प्राकृतिक घटक
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: द्वितीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 54]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
Chapter 5 द्वितीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ४. ४) | Page 54

RELATED QUESTIONS

A: मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.

R: उदयोगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.


दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते?


फरक स्पष्ट करा.

प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय.


उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा.


खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा:

सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा, ही आर्थिक प्रेरणा होय. उत्पादनाच्या क्षेत्रात या प्रेरणेस चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनांचा वापर करण्यात येतो. श्रमिक आणि भांडवलदार यांनी अधिक उत्साहाने काम करावे आणि उत्पादनवाढ व्हावी, या उद्देशाने ही प्रोत्साहने दिली जातात. आर्थिक प्रोत्साहनांखेरीज सत्तेची लालसा, नावलौकिकाची इच्छा, विशुद्ध सेवाभाव, देशभक्ती, यासारख्या प्रेरणांनीही मनुष्य उत्साहाने कामास लागू शकतो. किंबहुना प्रत्येकाच्या कार्य करण्याच्या वृत्तीमध्ये अशा सर्व प्रेरणांची कमी-अधिक सरमिसळ असते. असे असले तरी आर्थिक प्रेरणा ही महत्त्वाची प्रेरणा होय.

आर्थिक प्रोत्साहनाचे विविध प्रकार असू शकतात: नियुक्त काम ठरलेल्या वेळेपेक्षा आधी पूर्ण केले, तर त्यासाठी विशेष मोबदला (बोनस) देण्यात येतो. त्याचा तपशील त्या त्या कामाच्या संदर्भात कामाच्या स्वरूपाप्रमाणे ठरविता येतो. उत्पादनाचा दर्जा कायम राखून, किमान अपेक्षित उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन करून दाखविले, तर त्या अधिक उत्पादनासाठीही नेहमीच्या मोबदल्याहून अधिक असा विशेष दराने मोबदला दिला जातो. ज्यावेळी मजुरांमध्ये असंतोष निर्माण न होऊ देता उत्पादनवाढीसाठी निकराने प्रयत्न करावयाचा असतो, त्यावेळी या विशेष मोबदल्याच्या अपेक्षेने मजूर उत्साहाने कार्य करू शकतात. चांगल्या कामाला उत्तेजन दिली जाणारी बढती देखील सामान्यपणे वापरले जाणारे एक आर्थिक प्रोत्साहनच आहे.

  1. आर्थिक प्रेरणा म्हणजे काय?
  2. भांडवलदराचा उत्पादन वाढीसाठी कोणता उद्देश असतो?
  3. विशेष मोबदला (बोनस) का देण्यात येतो?
  4. द्वितीयक आर्थिक क्रियेतील कुशल आणि अकुशल कामगारात तुलना करा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×