Advertisements
Advertisements
Question
दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते?
Solution
दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग ॲमेझॉन नदीच्या विस्तृत खोऱ्याने व्यापला आहे. त्याचबरोबर खनिजांनी समृद्ध अशा चिली, पेरू या पश्चिम किनारी देशांमध्ये सपाट मैदानी प्रदेशाची कमतरता आहे. स्थानिक लोकसंख्याही कमी असल्यामुळे स्थानिक बाजारपेठ मर्यादित आहे. दक्षिण अमेरिकेतील बहुतांश देश हे आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या पुरेसे विकसित नाहीत. या सर्व कारणांमुळे दक्षिण अमेरिकेत उद्योगांच्या विकासावर मर्यादा पडल्या आहेत.
RELATED QUESTIONS
A: मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.
R: उदयोगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.
खालील संक्षिप्त टिप लिहा:
वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका.
फरक स्पष्ट करा.
प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय.
उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा.
खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा, ही आर्थिक प्रेरणा होय. उत्पादनाच्या क्षेत्रात या प्रेरणेस चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनांचा वापर करण्यात येतो. श्रमिक आणि भांडवलदार यांनी अधिक उत्साहाने काम करावे आणि उत्पादनवाढ व्हावी, या उद्देशाने ही प्रोत्साहने दिली जातात. आर्थिक प्रोत्साहनांखेरीज सत्तेची लालसा, नावलौकिकाची इच्छा, विशुद्ध सेवाभाव, देशभक्ती, यासारख्या प्रेरणांनीही मनुष्य उत्साहाने कामास लागू शकतो. किंबहुना प्रत्येकाच्या कार्य करण्याच्या वृत्तीमध्ये अशा सर्व प्रेरणांची कमी-अधिक सरमिसळ असते. असे असले तरी आर्थिक प्रेरणा ही महत्त्वाची प्रेरणा होय. आर्थिक प्रोत्साहनाचे विविध प्रकार असू शकतात: नियुक्त काम ठरलेल्या वेळेपेक्षा आधी पूर्ण केले, तर त्यासाठी विशेष मोबदला (बोनस) देण्यात येतो. त्याचा तपशील त्या त्या कामाच्या संदर्भात कामाच्या स्वरूपाप्रमाणे ठरविता येतो. उत्पादनाचा दर्जा कायम राखून, किमान अपेक्षित उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन करून दाखविले, तर त्या अधिक उत्पादनासाठीही नेहमीच्या मोबदल्याहून अधिक असा विशेष दराने मोबदला दिला जातो. ज्यावेळी मजुरांमध्ये असंतोष निर्माण न होऊ देता उत्पादनवाढीसाठी निकराने प्रयत्न करावयाचा असतो, त्यावेळी या विशेष मोबदल्याच्या अपेक्षेने मजूर उत्साहाने कार्य करू शकतात. चांगल्या कामाला उत्तेजन दिली जाणारी बढती देखील सामान्यपणे वापरले जाणारे एक आर्थिक प्रोत्साहनच आहे. |
- आर्थिक प्रेरणा म्हणजे काय?
- भांडवलदराचा उत्पादन वाढीसाठी कोणता उद्देश असतो?
- विशेष मोबदला (बोनस) का देण्यात येतो?
- द्वितीयक आर्थिक क्रियेतील कुशल आणि अकुशल कामगारात तुलना करा.