English

उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

उदयोगांच्या स्थानिकीकरणावर पुढील प्राकृतिक घटक परिणाम करतात :
(१) कच्चा माल: कोणत्याही उदयोंगधंदयाला कच्च्या मालाची आवश्यकता असते. कच्च्या मालाच्या स्वरूपावर उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण अवलंबून असते. काही कच्चा माल हा विशिष्ट स्थानी क्षेत्रातून उपलब्ध होतो. अशा कच्च्या मालावर आधारलेले उद्योगधंदे स्थानिक क्षेत्रात स्थापन करावे लागतात. उदा., लोह-पोलाद उदयोगधंदे हे लोखंडाच्या क्षेत्रात आढळून येतात. याला कारण लोहखनिज हा अवजड शिवाय वजन घटणारा कच्चा माल आहे.
$ज्या उदयोगधंद्याला लागणारा कच्चा माल शुद्ध स्वरूपाचा असतो, असे उदयोगधंदे बाजारपेठेच्या ठिकाणीदेखील उभारले असल्याचे आढळून येते. उदा., कापडगिरण्या पूर्वी मुंबई येथे होत्या.
ज्या उद्योगधंद्यांना अवजड सामान लागते व त्यांचे पक्क्या मालात रूपांतर होताना त्यांच्या वजनात घट होते, असे उदयोग कच्च्या मालाच्या क्षेत्रातच उभारले जातात. उदा., पोलाद उदयोग, सिमेंट उद्योग.
नाशवंत कच्च्या मालावर ठरावीक कालावधीत प्रक्रिया होणे जरुरीचे असल्यामुळे, असे उदघोगघंदे च्या मालाच्या क्षेत्रातच उभारले जातात. उदा., दुधावर प्रक्रिया करणारे दुग्धोत्पादक उदयोगधंदे, कृषी मालावर प्रक्रिया करणारे अन्नप्रक्रिया उदयोग, उसावर प्रक्रिया करणारा साखर उद्योग.
(२) सपाट जमीन: उदयोगांना कारखान्यांच्या उभारणीसाठी व विकासास सपाट जमीन आवश्यक असते. यामुळे कच्चा माल यंत्रसामुग्री यांची वाहतूकही सुलभ होते.
(३) ऊर्जा साधने: सर्व उद्योगधंदयांना ऊर्जा साधने आवश्यक असतात. ज्या प्रदेशात स्वस्त व मुबलक ऊर्जा साधने सहजगत्या उपलब्ध होतात, त्या प्रदेशात उद्योगधंदे स्थापन करणे सोयीचे व फायद्याचे ठरते. कोळसा, जलविद्युत शक्ती, खनिजतेल, अणुशक्ती ही प्रमुख ऊर्जा साधने आहेत. काही उद्योगधंदयांना कोळशाची जास्त आवश्यकता असते. लोह-पोलाद उद्योगात कोळशाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो; म्हणून त्याचे स्थानिकीकरण कोळशाच्या खाणीजवळ होते. उदा., भारतातील दुर्गापूर हे लोह-पोलाद निर्मितीचे केंद्र, ओडिशातील अॅल्युमिनियम उत्पादन केंद्र कोळसा क्षेत्रात आहे.
ज्या प्रदेशात कोळसा उपलब्ध नसतो, पण जलविद्युत उपलब्ध असते, अशा प्रदेशात जलविद्युत निर्मिती केंद्राच्या आसपास उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण होते. उदा., मुंबई येथील रासायनिक उद्योगांना खोपोली व कोयना वीज केंद्रातून विजेचा पुरवठा होतो.
(४) हवामान: काही उद्योगांना विशिष्ट प्रकारचे हवामान लागते. उदा., वस्त्रोदयोगाला दमट हवामान, तर सिमेंट उद्योगाला, कोरडे
हवामान आवश्यक असते. केवळ असे उद्योग विशिष्ट हवामान असलेल्या प्रदेशात स्थायिक झालेले आढळतात. नव्याने आलेले इलेक्ट्रानिक्स व संगणक सॉफ्टवेअर उदयोगही शुद्ध थंड हवेच्या प्रदेशात जास्त वेगाने वाढलेले दिसतात. उदा., बेंगलोर, हैदराबाद, पुणे.
(५) पाणीपुरवठा: उत्पादन प्रक्रियासाठी काही उदयोगांना भरपूर प्रमाणात पाणी लागते. असे उद्योग नदीकिनारी स्थाईक झालेले आढळतात. उदा., लोह-पोलाद, कागद निर्मिती.

shaalaa.com
द्वितीयक आर्थिक क्रियावर परिणाम करणारे - प्राकृतिक घटक
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: द्वितीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 54]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
Chapter 5 द्वितीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ६. १) | Page 54

RELATED QUESTIONS

A: मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.

R: उदयोगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.


दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते?


खालील संक्षिप्त टिप लिहा:

वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका.


फरक स्पष्ट करा.

प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय.


खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा:

सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा, ही आर्थिक प्रेरणा होय. उत्पादनाच्या क्षेत्रात या प्रेरणेस चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनांचा वापर करण्यात येतो. श्रमिक आणि भांडवलदार यांनी अधिक उत्साहाने काम करावे आणि उत्पादनवाढ व्हावी, या उद्देशाने ही प्रोत्साहने दिली जातात. आर्थिक प्रोत्साहनांखेरीज सत्तेची लालसा, नावलौकिकाची इच्छा, विशुद्ध सेवाभाव, देशभक्ती, यासारख्या प्रेरणांनीही मनुष्य उत्साहाने कामास लागू शकतो. किंबहुना प्रत्येकाच्या कार्य करण्याच्या वृत्तीमध्ये अशा सर्व प्रेरणांची कमी-अधिक सरमिसळ असते. असे असले तरी आर्थिक प्रेरणा ही महत्त्वाची प्रेरणा होय.

आर्थिक प्रोत्साहनाचे विविध प्रकार असू शकतात: नियुक्त काम ठरलेल्या वेळेपेक्षा आधी पूर्ण केले, तर त्यासाठी विशेष मोबदला (बोनस) देण्यात येतो. त्याचा तपशील त्या त्या कामाच्या संदर्भात कामाच्या स्वरूपाप्रमाणे ठरविता येतो. उत्पादनाचा दर्जा कायम राखून, किमान अपेक्षित उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन करून दाखविले, तर त्या अधिक उत्पादनासाठीही नेहमीच्या मोबदल्याहून अधिक असा विशेष दराने मोबदला दिला जातो. ज्यावेळी मजुरांमध्ये असंतोष निर्माण न होऊ देता उत्पादनवाढीसाठी निकराने प्रयत्न करावयाचा असतो, त्यावेळी या विशेष मोबदल्याच्या अपेक्षेने मजूर उत्साहाने कार्य करू शकतात. चांगल्या कामाला उत्तेजन दिली जाणारी बढती देखील सामान्यपणे वापरले जाणारे एक आर्थिक प्रोत्साहनच आहे.

  1. आर्थिक प्रेरणा म्हणजे काय?
  2. भांडवलदराचा उत्पादन वाढीसाठी कोणता उद्देश असतो?
  3. विशेष मोबदला (बोनस) का देण्यात येतो?
  4. द्वितीयक आर्थिक क्रियेतील कुशल आणि अकुशल कामगारात तुलना करा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×