English

साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

साखर उद्योग हा एक प्रमुख कृषी आधारीत उदयोग असून, हा मोठा उदयोग म्हणून म्हटला जातो. यात भरपूर गुंतवणूक लागते. भारतामध्ये हा उद्योग बहुतांशी सहकारी तत्त्वावर चालतो. जगभरात साखर उदयोग हा प्रामुख्याने ऊस आणि बीटरूट या कच्च्या मालावर आधारित उदयोग आहे. साखर उद्योगावर पुढील घटक परिणाम करतात:

 (१) कच्चा माल: साखर उद्योगाला ऊस किंवा बीटरूट हा कच्चा माल लागतो. बहुतांश उष्णकटिबंधीय देशांत साखर उद्योग हा ऊस आधारित उदयोग आहे. ऊस आणि बीटरूट हे दोन्ही नाशवंत कच्चा माल असून, तोडणीनंतर लवकरात लवकर त्याच्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते, साहजिकच साखर उद्योग हा कच्चा मालाच्या उत्पादन प्रदेशातच आढळतो.
(२) वाहतूक सुविधा: साखर उद्योगाला लागणारा कच्चा माल अवजड स्वरूपाचा कच्चा माल आहे. त्याचबरोबर उदयोगातून तयार झालेली साखर बाजारपेठेपर्यंत किंवा निर्यातीसाठी बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रगत वाहतूक सुविधांची आवश्यकता असते.
(३) अर्धकुशल आणि अकुशल मजूर: साखर उद्योगास भरपूर प्रमाणात मजूर पुरवठा लागतो. त्यामुळे ज्या प्रदेशात मजुरांची उपलब्धता असते, तेथे साखर उदयोग विकसित होतो अन्यथा अर्धकुशल किंवा अकुशल मजुरांचा पुरवठा करावा लागतो.
(४) साठवणक्षमता: कारखान्यातून तयार झालेली साखर विक्री होईपर्यंत नीट साठवून ठेवावी लागते. त्याला कारण अशा साखरेस पावसाचे पाणी व पुरापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे अशा साठवणक्षमतेसाठी खूप मोठी गोदामे बांधणे आवश्यक असते.
(५) विस्तृत जमीन: साखर उद्योगास विस्तृत जमीन लागते. कारखान्याची बांधणी, कापून आणलेल्या ऊसाची चढ-उतार आणि तयार साखरेची साठवणूक यांसाठी विस्तृत जमीन लागते.
(६) वीज पुरवठा: साखर उद्योगास वीज पुरवठा लागतो. काही प्रमाणात काही साखर कारखाने उसाच्या चिपाडापासून आपली स्वतःची वीजनिर्मिती करतात, मात्र हे प्रमाण खूप कमी आहे.
(७) भांडवल: साखर उद्योगाला भांडवल गुंतवणुकीची गरज असते. भारतातील बहुतांशी साखर उदयोग हे सहकारी तत्त्वावर चालवले जातात. ज्यात ऊस उत्पादक शेतकरी हेच कारखान्याचे भागधारक असतात आणि या कारखान्यातून मिळणाऱ्या नफ्यात ते वाटेकरी असतात.

shaalaa.com
उद्योगांचे वर्गीकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: द्वितीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 54]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
Chapter 5 द्वितीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ६. २) | Page 54

RELATED QUESTIONS

साखळी पूर्ण करा.

'अ' 'ब' 'क'
लघुउद्योग हाताने निर्मिती उद्योग चिनी मातीची भांडी बनवणे
कुटीरोद्योग कौशल्यावर आधारित टाटा लोह-पोलाद उदयोग
ग्राहकोपयोगी वस्तू वैयक्तिक कुंभार
खाजगी थेट वापरासाठी तयार औषधनिर्मिती

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.


सार्वजनिक उद्योग.


अनुमापी अनुकूलता.


फरक स्पष्ट करा.

वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग


फरक स्पष्ट करा.

अवजड उदयोग आणि हलके उद्योग.


लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात.


कृषीवर आधारित उद्योग ओळखा.


पुढील चुकीचा घटक ओळखा.

खनिजावर आधारित उद्योग -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×