Advertisements
Advertisements
प्रश्न
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर
शिरीष हा अत्यंत समंजस, वडिलांवर मनापासून प्रेम करणारा, त्यांचे संगीतसेवेचे स्वप्न स्वत: साकार करणारा ध्येयवेडा मुलगा आहे. वडिलांनी अपघातात ऐकण्याची क्षमता गमावल्यानंतर, त्यांची संगीताप्रती निष्ठा पाहून, त्यांच्या सुखाकरता तो वादन शिकायला लागला. आपल्या व्हायोलिनच्या शिकवणीवर्गाला वडिलांना सोबत नेऊ लागला. आपल्या या छोट्या छोट्या कृतींद्वारे शिरीष वडिलांना आनंद देण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या दांडग्या आकलनशक्तीने व हलक्या हाताच्या उत्कृष्ट वादन कौशल्याने त्याने तीन महिन्यांत वादनात बरीच प्रगती केली.
शिरीष हुशार व अभ्यासू वृत्तीचा आहेच; पण मनाने संवेदनशीलही आहे, म्हणूनच आपण वादनात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी नाना ते ऐकू शकत नाहीत, याची टोचणी त्याला आहे. तसाच तो प्रामाणिकही आहे, कारण त्याने आपल्या गैरहजेरीच्या कारणाचा निरोप व फीचे पैसे एका माणसामार्फत लेखकापर्यंत पोहोचवले. नाना वारल्यानंतर, नानांवरच्या प्रेमापोटी त्याने चोवीस तास ध्यासपूर्वक संगीतसाधना केली. ऐन कार्यक्रमादिवशी या नवख्या वादकाने धिटाईने व आत्मविश्वासपूर्वक अप्रतिम व्हायोलिन वादन करून लेखकालाही आश्चर्यचकित केले.
म्हणूनच, पितृप्रेम, धीटपणा, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, दांडगी आकलनशक्ती, ध्येयवेडी वृत्ती, कठोर मेहनत अशी शिरीषची कित्येक स्वभाववैशिष्ट्ये मनाला भावतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
आकृतिबंध पूर्ण करा.
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
गुणवैशिष्ट्ये लिहा.
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
आकृती पूर्ण करा.
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
कारणे लिहा.
लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.