Advertisements
Advertisements
प्रश्न
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
अनुच्या स्वभाव वैशिष्टयांचे वर्णन करा.
'शोध' या कथेतील अनुचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
उत्तर
शोध या कथेची नायिका अनु आहे. ती चारचौघींसारखी एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती तर्हेवाईक, विक्षिप्त वाटेल. पण तशी ती नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही, आपले विचार स्वतंत्र हवेत, मते स्वतंत्र हवीत यावर ती ठाम आहे. स्वतःचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ती पाच वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो, तेव्हा आपण आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगतो. अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वत:च्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय. याला अनु नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे. म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो. म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वत:ला स्थान मिळवते. इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व अनु स्वत:साठी घडवत होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अनूने घर सोडले; कारण ______________
‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली. कारण ______________
अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण ______________
खालील नातेसंबंध लिहा.
अनु आणि आबा ___________
खालील नातेसंबंध लिहा.
अनू आणि सुनीता ___________
कृती करा.
अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी
कृती करा.
आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये
नुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.
डॉक्टरचा पेशा |
नर्सचा पेशा |
घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.
एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
'कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध' तुमच्या शब्दांत लिहा.
'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हांला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.
‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
'शोध' कथेतील 'टॅक्सी ड्रायव्हर' या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.