Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात उत्तरे लिहा.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.
उत्तर
या कथेतील सर्वच प्रसंग मोठ्या कुशलतेने रचलेले आहेत. प्रत्येक प्रसंग उत्सुकता ताणत ताणत वाचकाला पुढे घेऊन जातो. त्यांतल्या पहिल्या प्रसंगात तर उत्कंठा शिगोशीग भरलेली आहे. पहिलेच वाक्य मुळी वाचकांची पकड घेते. कथानिवेदक स्वत:च्या व पत्नीच्या वतीने अनूची शरणागती पत्करून माफी मागावी तशी माफी मागतो. त्याच्या मनाची अत्यंत अगतिक अवस्था त्यातून दिसून येते. येथे वाचकाच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न उभे राहतात. काय केले असेल या दोघांनी? इतकी मिनतवारी करून माफी मागावी, असे काय घडले असेल? या तिघांचे एकमेकांशी नाते तरी कोणते असावे? सुरुवातीला अनू त्या दोघांची मुलगी तर नाही ना, अशी शंका वाचकाला वाटू लागते. तिचे जेवण आटपले होते. पण ती पानावर दिङ्मूढ, स्तंभित अवस्थेत बसली होती. एवढी कोणती मोठी आपत्ती कोसळली असेल? तिचे उद्गार त्या दोघांनाही जिव्हारी लागतात. पुढे थोडे वाचल्यावर अनू त्यांची मुलगी नाहीच, हे लक्षात येते. साधारणपणे त्रयस्थांशी आपण टोकाचे वागत नाही. अशा प्रकारे वाचकाची उत्कंठा सतत टिकवून ठेवण्याचे फार मोठे कौशल्य दिसून येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अनूने घर सोडले; कारण ______________
‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली. कारण ______________
अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण ______________
खालील नातेसंबंध लिहा.
अनु आणि आबा ___________
खालील नातेसंबंध लिहा.
भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ___________
खालील नातेसंबंध लिहा.
अनू आणि सुनीता ___________
कृती करा.
आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये
नुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.
डॉक्टरचा पेशा |
नर्सचा पेशा |
घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
कथेच्या 'शोध' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
'कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध' तुमच्या शब्दांत लिहा.
'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हांला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.
‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
'शोध' कथेतील 'टॅक्सी ड्रायव्हर' या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.