Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात उत्तरे लिहा.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.
उत्तर
या कथेत पावलापावलावर कलाटणी मिळत जाते. त्या प्रसंगांमधला एक प्रसंग मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो संपूर्ण कथेलाच कलाटणी देतो. भर मध्यरात्री कथानिवेदक, मुक्ता व अनू भिड्यांना भेटण्यासाठी निघाले. वाचकाला वाटू लागते की आता काय तो सोक्षमोक्ष लागेल. ती नोट भिड्यांकडे असेल, तर मिळेलच. मग सर्व प्रश्न मिटतील आणि टॅक्सीवाल्याकडे असेल, तर शोधच खुंटेल. मात्र घडते ते विलक्षणच. वाचकाच्या कल्पनेतही नसलेले घडते. भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस येतो. या अपघाताने अकल्पित घटना घडतात. नोट मिळते, टॅक्सी ड्रायव्हरचे या सर्वांशी भावनिक नाते निर्माण होते. नोट मिळाल्यामुळे नोटेचा इतिहास कळतो. त्या मुलीच्या आजारपणाचे हृदयद्रावक दर्शन घडते. अनू त्या मुलीच्या कुटुंबीयांशी मनाने जोडली जाते. अखेरीस हेही स्पष्ट होते की त्या मुलीचे वडील तो टॅक्सी ड्रायव्हरच होता. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. त्या एका अपघाताच्या प्रसंगाने कथेला खूप उंचीवर नेऊन ठेवलेले दिसून येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अनूने घर सोडले; कारण ______________
‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली. कारण ______________
अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण ______________
खालील नातेसंबंध लिहा.
अनु आणि आबा ___________
खालील नातेसंबंध लिहा.
अनू आणि सुनीता ___________
कृती करा.
आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये
नुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.
डॉक्टरचा पेशा |
नर्सचा पेशा |
घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
कथेच्या 'शोध' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
'कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध' तुमच्या शब्दांत लिहा.
'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
'शोध' कथेतील 'टॅक्सी ड्रायव्हर' या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.