Advertisements
Advertisements
प्रश्न
‘संकटांना न घाबरता तोंड दयावे’, याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा.
दीर्घउत्तर
उत्तर
सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार वि. स. खांडेकर यांची हरिणी व पारधी' ही एक रूपक कथा आहे.
हरिणी जिवांच्या आकांताने धावत होती. तिच्यामागे एक पारधी बाण रोखून तिचा पाठलाग करीत होता. धावत धावत ती एका पहाडाच्या टोकावर आली. खाली दरी होतो नी मागे पारथी, पुढे जावे तर दरीत कोसळून मरण येणार नी पाठीमागे साक्षात मृत्यू बाण रोखून. हरिणीने क्षणभर विचार केला. थांवली नी वळून पारध्याला सामोरी झाली, डोळे रोखून उभी राहिली. तिचे ते धैर्य पाहून पारध्याच्या हातातील बाण गळून पडला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?