Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
पोलिओ निर्मूलन
टीपा लिहा
उत्तर
(१) भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे १९९५ मध्ये 'पल्स पोलिओ' ही लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली.
(२) जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विदयमाने ही मोहीम राबवण्यात आली.
(३) पोलिओ रोगाचे भारतातून उच्चाटन करणे व पाच वर्षे वयापर्यंतचे एकही बालक लसीकरण यातून वगळले जाणार नाही हे पाहणे, ही या मोहिमेची उद्दिष्टे होती.
(४) ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे घेणे, घरोघरी लसीकरण करणे, प्रसार माध्यमातून जाहिराती देणे अशा उपायांचा अवलंब करून शासन लोकांत जागृती घडवून आणते आहे.
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - आरोग्य
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?