Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
वायू प्रदूषण
टीपा लिहा
उत्तर
(१) हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे आणि अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढत जाणे, यालाच 'वायू प्रदूषण' असे म्हणतात.
(२) हे वायू प्रदूषण कारखान्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर, काजळी, तसेच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यांमुळे होते.
(३) वाहनांची वाढती संख्या, वाहनांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष यांमुळे वायू प्रदूषण जलद गतीने वाढते.
(४) भारतातील सर्वच शहरांमध्ये वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. कारण वायू प्रदूषणामुळे लोकांचे श्वसनविकार वाढत चालले आहेत. वायू प्रदूषण कमी व्हावे म्हणून शासन अनेक प्रकारचे उपाय व कायदे करीत असते.
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - पर्यावरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?