Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
मराठी रंगभूमी
टीपा लिहा
उत्तर
- व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे 'रंगभूमी' होय. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे 'मराठी रंगभूमीचे जनक' होत.
- सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे.
- 'थोरले माधवराव पेशवे' या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले.
- मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले.
shaalaa.com
मराठी रंगभूमी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?