Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
उत्तर
युरोपमधील अभ्यासकांना पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांबद्दल कुतूहल होते. अशा प्रकारचा, आदर व कौतुक असलेल्या काही अभ्यासकांना प्राच्यवादी म्हटले जाते.
- प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. यातूनच त्यांनी संस्कृत व युरोपीय भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो-युरोपीय भाषा अस्तित्वात होती अशी कल्पना मांडली.
- इसवी सन १७८४ मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे स्थापन केलेल्या 'एशियाटिक सोसायटीच्या'द्वारे भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली.
- प्राच्यवादी अभ्यासकांमधील एक प्रमुख जर्मन इतिहासकार फ्रेडरिक मॅक्सम्युलर याने संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषागटातील अतिप्राचीन शाखा होती असे प्रतिपादन केले. मॅक्सम्युलने 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच, 'द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट' या नावाने ५० खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन असणारे सहा खंड प्रसिद्ध केले आणि ऋग्वेदाचा इंग्रजी अनुवादही केला आहे.
- एडवर्ड सैद या विद्वानाने अलीकडच्या काळातील प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्रज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणले.
अशाप्रकारे, प्राच्यवादी अभ्यासकांनी प्राचीन वाङ्मय व इतिहासाच्या दृष्टीने इतिहासलेखन केलेले आहे.
संबंधित प्रश्न
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ | ______ |
______ |
द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | ______ |
______ | हू वेअर द शूद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया |
जेम्स ग्ँट डफ | ______ |
______ | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री. अ. डांगे | ______ |
______ | हू वेअर द शुद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
स्त्रीवादी लेखिका | स्त्रीवादी लेखन |
ताराबाई शिंदे | ______ |
______ | द हाय कास्ट हिंदू वुमन |
मीरा कोसंबी | ______ |
______ | रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज |
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
वंचितांचा इतिहास
बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.