Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
लघु उत्तर
उत्तर
मी पाचवीत एका वक्तृत्व स्पर्धेत भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम आहे. त्या दिवसापासून आजतागायत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. नीट स्वच्छ ती विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणालाही हात देत नाही. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे. माझे त्यावर खूप प्रेम आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?