Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा.
उत्तर
n(S) = 52
समजा, घटना A = पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे.
n(A) = 12
P(A) = `("n"("A"))/("n"("s"))`
= `12/52`
= `3/13`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ______ आहे.
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ______ आहे.
एक नाणे व एक फासा एकाचवेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) घटना A: काटा व सम संख्या मिळणे.
ii) घटना B: छापा व विषम संख्या मिळणे.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या विषम असेल.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या 5 च्या पटीत असेल.
बास्केटबॉल खेळाडू जॉन, वासिम व आकाश एका ठरावीक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता `4/5`, वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे, तर कोणाची संभाव्यता सर्वांत जास्त आहे?
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. त्यांतून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे, तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.
एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करून लिहा.
कृती:
एक फासा टाकला असता नमुना अवकाश 'S' आहे.
S = `{square}`
∴ n(S) = 6
घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.
A = `{square}`
∴ n(A) = 3
∴ P(A) = `square/("n"("S"))` ............(सूत्र)
∴ P(A) = `square`