English

1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: 1. खालील आकृती पूर्ण करा: अरुणिमाला अमान्य असणाऱ्या गोष्टी आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला... - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. खालील आकृती पूर्ण करा:          (2)

आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला... एक सांगू? लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण Fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे....... जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलिंडर आम्हांला दिसला. माझ्या शेरपाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या 'डेथ झोन' मधून सहीसलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे..... आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर 'एव्हरेस्ट' मी सर केले होते!

गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्‍वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच; पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्‍ती आहोत की नाहीत हे ठरतं.

2. खालील चौकटी पूर्ण करा.          (2)

3. स्वमतः         (3)

“कर्तृत्ववान माणूस नशिबावर अवलंबून राहत नाही' याविषयी तुमचे मत लिहा.

Comprehension

Solution

1.

2.

3. आयुष्यात सर्व गोष्टी सहज मिळाव्यात अशी अपेक्षा ठेवणे म्हणजेच "दे रे हरी खाटल्यावरी" अशी मानसिकता होय. अशी व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही, कारण कष्टाला कोणताही पर्याय नसतो. मेहनतीमुळेच योग्य दिशा सापडते. म्हणूनच कर्तृत्ववान व्यक्ती नशिबावर अवलंबून राहत नाही. ज्या व्यक्तीला आपल्या कामावर, मेहनतीवर, आणि कर्तृत्वावर विश्वास असतो, ती आपले यश किंवा अपयश नशिबावर ढकलत नाही. मेहनतीचा परिणाम म्हणून यश आपोआप मिळते, त्यामुळे कर्तृत्ववान माणूस नशिबावर अवलंबून राहत नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×