Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. चौकटी पूर्ण करा: (2)
आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न् मग त्या गावभर जायच्या. कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हांला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत, सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. |
2. एका शब्दात उत्तरे लिहा: (2)
- वर्तमानपत्राची संपादक - ______
- वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच - ______
3. स्वमत: (3)
'आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा व त्याविषयी तुमचे मत लिहा.
Comprehension
Solution
1.
2.
- वर्तमानपत्राची संपादक - आजी
- वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच - आगळ
3.
लेखक सांगतात की, वर्तमानपत्रांप्रमाणेच त्यांच्या वाड्याच्या ढाळजेमध्ये दुपारच्या वेळी गावातील बायका कामे घेऊन एकत्र येत. त्या काम करता करता गप्पा मारत, चर्चा करत, आणि आजूबाजूच्या घडामोडींबद्दल माहिती घेत. या गप्पा केवळ मनोरंजनासाठीच नव्हे, तर गावातील किंवा बाहेरच्या घटना जाणून घेण्यासाठी होत. जसे वर्तमानपत्राच्या बातम्या छापण्याआधी त्यांची सत्यता तपासली जाते, तसेच या ढाळजेमध्ये चर्चेतील बातम्याही गावभर जाण्यापूर्वी शहानिशा केल्या जात. यामध्ये आजी संपादकाची भूमिका पार पाडत असत. म्हणूनच लेखकाने म्हटले आहे की, “आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं."
shaalaa.com
Is there an error in this question or solution?