Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. आकृतिबंध पूर्ण करा: (2)
- अधिकारवाणीने जागा होणारा - ______
- राष्ट्राचे प्रमुख असणारे - ______
आपण कोणतंही कार्य करताना 'मी' सोडून सर्वांनी हे करावं अशी भूमिका असते. पण आमचं नेमकं चुकतं कुठे? इथेच तर! कारण 'मी' स्वतःला कधी गृहीत न धरल्याने माझ्यातील अधिकारवाणीचा अहंभाव जागा होतो. त्यामुळे केवळ हे काम माझे नाहीच ते इतरांनी करायचे आहे अशीच माझ्या मनाची भूमिका होते. पण या भूमिकेत जे कोणी असतात त्यांनी एक ओळखायला हवे की स्वत:कडे ध्येय नसताना इतरांकडून कोणतीही कृती करून घ्यायची तेव्हा आमची अवस्था “तुझं आहे. तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी” अशीच होणार. आजपर्यंत डॉ. कलाम सर यांनी नेमकं हेच जाणलेलं होतं. आपण तसे एका राष्ट्राचे राष्ट्रपती आहोत, म्हणून केवळ अधिकारवाणीने जगत राहिलो तर, तर काहीच साध्य होणार नाही. संदर्भ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चिरंतन प्रेरणा लेखक - श्री. के. आर. पाटील प्रकाशक - ज्ञानसंवर्थन प्रकाशन, कोल्हापूर |
2. योग्य पर्याय निवडा: (2)
- अहंभावी माणसाजवळ नसणारी गोष्ट - ______
(अ) मीपणा
(आ) ध्येय
(इ) अधिकारवाणी
(ई) साध्य - डॉ. कलाम यांनी जाणलेली गोष्ट - ______
(अ) अधिकारवाणी गाजवणं
(आ) इतरांकडून काम करून घेणं
(इ) ध्येयनिष्ठ बनून काम करणं
(ई) कामाकडं दुर्लक्ष करणं
Solution
1.
- अधिकारवाणीने जागा होणारा - अहंकार
- राष्ट्राचे प्रमुख असणारे - राष्ट्रपती
2.
- अहंभावी माणसाजवळ नसणारी गोष्ट - ध्येय
- डॉ. कलाम यांनी जाणलेली गोष्ट - ध्येयनिष्ठ बनून काम करणं.