English

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: 1. आकृती पूर्ण करा: (2) वस्तूंजवळ नसलेल्या मानवी बाबी वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. आकृती पूर्ण करा:          (2)

वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही. 
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.

2. कारणे लिहा:             (2)

  1. वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण...
  2. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण...

3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा:        (2)

आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.

4. काव्यसाैंदर्य:         (2)

'वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची' या बाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.

Comprehension

Solution

1.

2.

  1. आपल्या आयुष्याचा अंत झाल्यानंतरही या वस्तू आपल्या स्नेहाची आठवण जिवंत ठेवतील.
  2. एखादी वस्तू वापरण्यायोग्य न राहिल्यावर ती अडगळ बनते.

3.

जेव्हा एखादी वस्तू वापरण्यायोग्य राहत नाही, तेव्हा ती तिच्या जागेवरून बाहेर काढली जाते. मात्र, वर्षानुवर्षे आपल्या घराचा भाग असलेल्या या वस्तूंना कृतज्ञतेने निरोप देणे हा त्यांचा हक्क आपण नक्कीच जपला पाहिजे.

4. 'वस्तू' या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंचे आपल्या जीवनातील महत्त्व आणि त्यांच्याशी असलेले भावनिक बंध यावर विचार मांडला आहे. नियमित वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्वच्छ ठेवल्यास त्यांचा अधिक चांगला आणि दीर्घकालीन उपयोग होतो. दैनंदिन वापरातील वस्तू दररोज स्वच्छ केल्या आणि व्यवस्थित ठेवल्या तर त्या आकर्षक दिसतात, तसेच त्यांना पाहून मन प्रसन्न होते.

वस्तूंची योग्य काळजी घेतल्यावर त्या आपल्या भावनांना प्रतिसाद देत समाधान अनुभवत असतील, असे कवी सुचवतात. वस्तूंनाही भावना असतात आणि त्यांनाही स्वच्छ राहायला आवडते, असा वेगळा आणि मनाला भिडणारा दृष्टिकोन कवितेतून व्यक्त होतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×