Advertisements
Advertisements
Question
१९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या?
Answer in Brief
Solution
१९३९ ते १९४५ या काळात भारतामध्ये पुढील घडामोडी झाल्या.
- नोव्हेंबर १९३९ - ब्रिटिशांच्या युद्धविषयक धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी प्रांतांमधील काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.
- मार्च १९४० - मुस्लीम लौगच्या लाहोर अधिवेशनात पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव मान्य झाला.
- ऑगस्ट १९४० - व्हॉईसरॉय लिनलिथगो यांनी ऑगस्ट घोषणा केली.
- ऑक्टोबर १९४० - ऑगस्ट घोषणेत भारताला स्वराज्य मिळण्याच्या दृष्टीने तरतुदींचा समावेश नसल्याने म. गांधीच्या आदेशानुसार वैवक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू झाली. त्यामध्ये विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते.
- जानेवारी १९४१ - सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांच्या कैदेतून गुप्तपणे पलायन केले व ते जर्मनी येथे जाऊन पोहोचले.
- मार्च १९४२ - ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी भारत मंत्री सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली भारताला वसाहतीचा दर्जा देण्यासाठी “क्रिप्स मिशन' भारतात पाठवले.
- ऑगस्ट १९४२ 'चले जाव' चळवळीस सुरुवात.
shaalaa.com
जागतिक युद्धाची पार्श्वभूमी
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ______.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.
पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
मुद्दे | पहिले महायुद्ध | दुसरे महायुद्ध |
१. कालखंड | ||
२. सहभागी राष्ट्रे | ||
३. परिणाम - (राजकीय व आर्थिक) | ||
४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना |
युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला. परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या?
जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकूमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकूमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला?