Advertisements
Advertisements
Question
एका धातूच्या गोळ्याची त्रिज्या 9 सेमी आहे. तो गोल वितळवून 4 मिमी व्यासाची धातूची तार काढली, तर त्या तारेची लांबी किती मीटर असेल?
Sum
Solution
दिलेले: धातूच्या गोळ्यासाठी, त्रिज्या (R) = 9 सेमी
वृत्तचिती आकाराच्या तारेसाठी,
व्यास (d) = 4 मिमी
शोधा: तारेची लांबी (h)
उकल:
धातूच्या गोळ्याचे घनफळ = `4/3piR^3`
= `4/3 xx pi xx 9^3`
= 972π सेमी3
तारेचा व्यास (d) = 4 मिमी = `4/10` सेमी .......[∵ 1 सेमी = 10 मिमी]
= 0.4 सेमी
∴ तारेची त्रिज्या (r) = `d/2 = 0.4/2 = 0.2` सेमी
तारेचे घनफळ = `pir^2h`
= π (0.2)2h
= 0.04πh सेमी3
परंतु, तारेचे घनफळ = गोळ्याचे घनफळ
∴ 0.04 πh = 972π
∴ h = `972/0.04`
= `97200/4`
= 24300 सेमी
= `24300/100` मी ............[∵ 1 मी = 100 सेमी]
∴ h = 243 मी
∴ तारेची लांबी 243 मीटर आहे.
shaalaa.com
गोलाचे घनफळ
Is there an error in this question or solution?